Nashik Cloudburst Warning : ढगफुटीसदृश्य पावसासाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्रीच 100 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पोलीस तैनात, अधिकारी अलर्ट

Nashik Cloudburst Warning : ढगफुटीसदृश्य पावसासाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्रीच 100 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर, पोलीस तैनात, अधिकारी अलर्ट

नाशिक : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पाश्वभूमीवर काल, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने नाशिक येथे ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मध्यरात्रीपासून नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाचा त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरासाठी अतिवृष्टी/ढगफुटीसदृश पावसाचा इशारा देण्यात आला असून 300 मिमीपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र सोमवार मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरातील सुमारे 100 नागरिकांचे रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही धरणांतून नियंत्रित पाणी विसर्ग सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचा : Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! कोकण, पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजेस बंद

ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने त्र्यंबकेश्वरमध्ये तयारीचे उपाययोजनांची माहिती दिली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “ढगफुटीचा इशारा देण्यात आला असून 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज रात्री 1 वाजल्यापासून ते उद्या सकाळी १० वाजेपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सर्व आवश्यक खबरदारीचे उपाय योजले आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हाय अलर्टवर आहेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनावर सध्या बंदी घातली आहे. उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील आणि अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन आम्ही सर्वांना केले आहे. आम्ही मुंबई आणि नाशिक अशा दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवली आहेत.”

तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. स्वामी यांनी माहिती दिली की, “नागरिकांना निश्चित केलेल्या ठिकाणी हलवण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक व्यवस्था करत आहोत. हे स्थलांतर सुरळीत आणि कोणत्याही अडचणीविना पार पडेल, अशी ग्वाही आम्ही सर्वांना दिली आहे. पोलीस बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला आहे. तसेच उद्या सकाळीही तो कायम राहील. आम्ही रस्त्यांवर अडथळे (बॅरिकेड्स) उभारून वाहतूक नियंत्रित करू. आज सकाळपासून दर्शनावर बंदी असल्याने, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तपासणी नाके (चेक पॉइंट्स) उभारणार आहोत. पर्यटकांना आमचे आवाहन आहे की त्यांनी येथे येऊ नये”, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नमूद केले. शिवाय जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण जिल्ह्यात पोलीस आणि आरोग्य विभागाची मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ज्या भागांत परिस्थिती संभाव्यतः धोकादायक वाटत आहे. तिथून आम्ही लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवले आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version