Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या यादीत नावचं नाही, हताश शेतकऱ्यांनं शेतातच संपवलं जीवन; परिसरात हळहळ

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या यादीत नावचं नाही, हताश शेतकऱ्यांनं शेतातच संपवलं जीवन; परिसरात हळहळ

नांदेड : महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून या शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यांनी नुकतीच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून राज्यातील काही शेतकऱ्यांना त्यामुळे दिलास मिळाला आहे. मात्र अशातच नांदेडमध्ये एक दुर्देैवी घटना घडली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Stray Dogs Issue : दहशत! दिवसाला 13 जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा; हल्ल्यात दोन चिमुकल्याचा बळी, तर दोन बालके गंभीर

लोहा तालुक्यातील बोरगाव येथे ७० वर्षीय पिराजी गायकवाड यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून सुमारे ६० हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. कर्जमाफीच्या जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. तर हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील घटनेत ६० वर्षीय शेतकरी चंद्रभान दादाराव कदम यांच्यावर ७ एकर शेती असून ग्रामीण बँकेचे सुमारे १ ते सव्वा लाख रुपयांचे कर्ज होते. वेळेत कर्जमाफी न मिळाल्याच्या मानसिक तणावातून त्यांनी मंगळवारी आपल्या शेतातील आखाड्यावर विष प्राशन करून आत्महत्या केली, अशी माहिती त्यांचा मुलगा निवृत्ती कदम यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version