प्रसिद्ध कोरियन गायकाने केली आत्महत्या

प्रसिद्ध कोरियन गायकाने केली आत्महत्या

मुंबई, २२ जून २०२३ , प्रतिनिधी : देशात कोरियन गायकांची बरीच लोकप्रियता आहे. तरुण वर्ग आज कला या कोरियन गायकांकडे खूप आकर्षित होताना दिसत आहे. दरम्यान एका कोरियन गायकाचे अचानक निधन झाले आहे. 2011 मध्ये कोरियाज गॉट टॅलेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला कोरियन गायक चोई सुंग-बोंगचे निधन झाले आहे. तो 33 वर्षांचा होता.

दक्षिण कोरियातील येओक्सम-डोंग जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरी चोई सुंग-बोंग याने आत्महत्या केली. कोरिया टाईम्सच्या वृत्तानुसार, 33 वर्षीय सुंग-बोंग याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक मजकूर लिहीत आत्महत्या केली. या मजकुरात त्याने लिहिले,”माझ्या मूर्ख चुकीमुळे ज्यांना त्रास झाला आहे त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो.” याशिवाय त्याला मिळालेल्या सर्व देणग्या त्याने परत केल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version