Virar-Bharuch MEMU: विरारहून भरूचकडे जाणाऱ्या ‘मेमू’ ट्रेनचा डबा घसरला; पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

विरारवरून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या मेमू ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. विरारवरून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या मेमू ट्रेनचा गुजरात मधील वलसाड जिल्ह्यातील भिलाड रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. 
Virar-Bharuch MEMU: विरारहून भरूचकडे जाणाऱ्या ‘मेमू’ ट्रेनचा डबा घसरला; पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

विरारवरून भरूचच्या दिशेने जाणाऱ्या मेमू ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. विरार–भरूच मेमू (गाडी क्रमांक 19101) भिलाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत असताना पुढील डीएमसी (ड्रायव्हिंग मोटर कोच) चे चार चाके रुळावरून घसरली आहेत. ही घटना सकाळी 6:27 वाजता घडली असून मोठा अनर्थ टळला आहे. 

हेही वाचा- Mumbai Water Cut: धो-धो पाऊस पडूनही मुंबईकरांवर पाणीसंकट; काही भागांत 25 टक्के पाणीकपातीची शक्यता

डबा रुळावरून घसरल्याचे लोको पायलटच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा रेल्वे कर्मचाऱ्याला कोणतीही दुखापत अथवा इजा झालेली नाही. रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुळावर चाके पुन्हा चढविण्याचे (रि-रेलमेंट) काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गाडी घसरल्यामुळे विस्कळीत झालेली पाहायला मिळाली, पश्चिम रेल्वे वरून लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्या सर्व उशिराने धावत आहेत. यावेळी मुंबईहून गुजरात आणि अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून अनेक गाड्या विलंबाने धावत असल्या तरीही डहाणूपर्यंत लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर इंटरसिटी एक्सप्रेस गेले अर्धा तास विरार स्थानावर उभी आहे. तसेच गुजरात वरून जाणाऱ्या गाड्या सर्व दुसऱ्या मार्गाने चालवण्याचा विचार करण्यात येत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version