पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीवर बलात्कार

पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चिमुकलीवर बलात्कार

राज्यात महिला आणि लहान मुलींवर होणारे अत्याचार काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आता नवी मुंबईमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आई लघुशंकेसाठी गेल्याचा फायदा उचलत या नराधमाने मुलीला उचलून नेत शेजारी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार करत तेथून पळ काढला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पनवेल रेल्वे स्थानकावर पीडित मुलगी आपल्या आईसोबत झोपली होती. यावेळी आई लघुशंकेसाठी गेली असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने ३ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत जवळच असलेल्या निर्मनुष्य जागेत नेत तिच्यावर अत्याचार करुन तिथून पळून काढला. आई परत आल्यानंतर मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच शोधाशोध करत पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गाठत याबद्दलची माहिती देण्यात आली.

यावेळी पोलिसांनी तपास सुरु केला असता सदर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी तात्काळ 3 टीम बनवत आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान, पोलिसांनी शोध घेतल्यानंतर जुईनगर स्थानकावर मनोज कुमार या संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची कसून तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. तसेच तो कळंबोली ब्रिजखाली वास्तव्य करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून चिमुकलीवर पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पनवेल शहरामध्ये वारंवार स्रिया लहान मुलींविषयी अत्याचार छेडछाड केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शहरामध्ये सतत भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरील लहान मुलीचे जीवन देखील सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version