भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केल्याने सोमय्यांवर गुन्हा दाखल

भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केल्याने सोमय्यांवर गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करत दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केले की, ‘ठाकरे सरकार/ पोलिसांची माझ्या विरुद्ध आणखी एक नोटीस. छगन भुजबळ यांच्या सांताक्रुझ येथील बेनामी प्रॉपर्टी ९ मजली बंगल्याची पाहणी केल्याबद्दल माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.’

छगन भुजबळांच्या बेनामी मालमत्तेची पाहणी केल्यामुळे पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. चौकशीसाठी हजर राहिले नाही तर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी धाडलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version