म्हशीने खाल्लं 5 तोळे सोनं…

म्हशीने खाल्लं 5 तोळे सोनं…

चोरांच्या भीतीने आपल्याकडील दागदागिने दडवून ठेवण्याची पद्धत असते. मात्र हीच पद्धत साताऱ्यातल्या एका म्हशीला मात्र चांगलीच महागात पडली आहे. कारण या म्हशीने चक्क 5 तोळे सोन्याचं सोनं खाल्लं आहे.

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त साधना पाटील या मांडवे येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. यावेळी चोरांच्या भीतीने रात्री त्यांनी आपल्याकडील दागिने पेंडीच्या पोत्यात लपवून ठेवलं. सकाळी साधना यांचे बंधू सुनिल खाडे यांनी नेमकी याच पोत्यातील पेंड म्हशीच्या पुढे घमेल्यात खायला ठेवली आणि त्यावेळी म्हशीने पेंडीसोबत चक्क पाच तोळे वजनाच्या सोन्याचं मणीमंगळसूत्रही खाल्लं. ही बाब सुनिल खाडे यांच्या लक्षात आली आणि मग एकच धांदल उडाली.

अखेर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खाडे यांना पाचारण करण्यात आले. खाडे यांनी त्या म्हशीच्या पोटाची यशस्वी शस्त्रक्रिया करून ते पाच तोळे सोन्याचे मणीमंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढलं. दीड लाख रूपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्रही आता परत मिळालं आहे आणि म्हैसही सुखरूप आहे. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version