Pune News : येत्या 14 तारखेला लग्न, मात्र संसाराची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणावर काळाचा घात; अन् आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले

गुरुवारी 18 जून रोजी होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pune News : येत्या 14 तारखेला लग्न, मात्र संसाराची स्वप्ने उराशी बाळगलेल्या तरुणावर काळाचा घात; अन् आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले

गुरुवारी 18 जून रोजी होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय केतन विशाल अग्रवाल हा आपल्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. किल्ल्यावर फिरत असताना त्याला तेथील निसर्गरम्य वातावरणाची आठवण म्हणून काही फोटो काढावेसे वाटले.

याच कारणाने तो ओलसर व निसरड्या भागावर गेला आणि त्याचा तोल जाऊन तो थेट खोल दरीत पडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि लोनावळा ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर केतनला तेथून बाहेर काढण्यात आले. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली होती, ते पाहून केतन याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा- Vishakha Tilkar Death : संतापजनक! पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी घरात कॅमेरे लावले; विवाहानंतर केवळ 47 दिवसांत 26 वर्षीय तरुणीने जीवन संपवलं, पतीसह तिघे अटकेत

लग्नाच्या आनंदमय वातावरणात अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अगरवाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केतन अग्रवाल हा पुणे जिल्ह्यातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीचा रहिवासी होता. येत्या 14 तारखेला केतनचा विवाह सोहळा जयपूर येथे पार पडणार होता. यासाठी विमान प्रवासाची तिकिटे तसेच एका आलिशान पॅलेस हॉलचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने उराशी बाळगलेल्या केतनचा काळाने घात केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version