जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महापालिका शाळांमधील मराठी माध्यमांसह हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु, कन्नड आणि उर्दू माध्यमातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक खरेदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सुमारे 1 कोटी 73 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पालिकेच्या पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. याच धर्तीवर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.