उदगीरमध्ये साहित्यिकांचा मेळावा

उदगीरमध्ये साहित्यिकांचा मेळावा

आजपासून लातूर येथील उद्गीरमध्ये ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात झाली आहे. दोन वर्षानंतर मराठी साहित्य संमेलनाचा मेळावा निर्बंधमुक्त पार पडत आहे. त्यामुळे साहित्य प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन UPDATE :   

शरद पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

ग्रंथ दिंडीनंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम

ग्रंथदिंडीनंतर उदगीरमध्ये ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ध्वजारोहण करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कैतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.

मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने

लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ग्रंथ दिंडी संमेलन स्थळाकडे निघाली असून संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. दिंडीचा मार्ग रांगोळी आणि कमानीने सजला आहे. तर या ग्रंथदिंडीत विद्यार्थी, नागरिक, साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version