रशियातील मॅकडोनाल्डचे ८५० दुकाने बंद

रशियातील मॅकडोनाल्डचे ८५० दुकाने बंद

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशिया युक्रेनवर तीव्र लढाई करत असून दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सर्वत्र जगभर खळबळ उडाली असून अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. दरम्यान, आता बड्या कंपन्यासुद्धा रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत.

मॅकडोनाल्ड्सने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मॅकडोनाल्ड्सने रशियातील एकूण ८५० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील ८४ टक्के हॉटेल्स हे मॅकडोनाल्ड कंपनीकडे आहे. मात्र, आता युक्रेन देशाच्या समर्थनार्थ मॅकडोनाल्ड कंपनीने रशियातील ८५० दुकाने तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

युद्धाच्या चौदाव्या दिवशी रशियाने आपला हल्ला अधिक तीव्र करत आता रणगाड्यांच्या सहाय्याने रशिया युक्रेनची शहरे काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या दृष्टीने आता रशियाने रणगाडे उतरवत आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. त्यामुळे आता युद्धजन्य परिस्थिती तीव्र होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version