परमबीर सिंह यांची ७ तासांची चौकशी

परमबीर सिंह यांची ७ तासांची चौकशी

खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. मात्र फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत चौकशीसाठी हजर झाले आहेत. खंडणी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंह कांदिवलीमधील गुन्हे शाखेत हजर झाले. सात तासांच्या चौकशीनंतर परमबीर सिंह गुन्हे शाखेतून घराकडे परतले. तब्बल २३१ दिवसांनी आज परमबीर सिंह चौकशीसाठी हजर झाले.

‘मी भारतातच असून माझ्या जिवाला धोका असल्याचे’ वक्तव्य परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे परमबीर सिंह यांनी त्यांच्या वकिलामार्फत सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. न्यायलयाच्या या निर्णयामुळे परमबीर सिंह आज मुंबईत चौकशीसाठी हजर झाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंग यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसमोर हजर न राहिलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version