विधानसभा निवडणुकीत ६५.६९% मतदान

विधानसभा निवडणुकीत ६५.६९% मतदान

कर्नाटक विधानसभा निवणुक बुधवारी (१० मे) रोजी पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. कर्नाटक विधानसभेच्या या निवडणूकीत ६५.६९% इतके मतदान झाले आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील ५ कोटी ३१ लाख मतदार मतदान होते. मतदानादरम्यान एकूण ७५ हजार ६०३ बॅलेट युनिट, ७० हजार ३०० कंट्रोल युनिट आणि ७६ हजार २०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल वापरण्यात आले. तर बुधवारी झालेल्या निवडणूकीत ६५.६९% इतके मतदान झाले आहे.

या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचारात कंबर कसली. तर, बुधवारी मतदान होऊन १३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याने भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे शुक्रवारी ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version