बुलढाण्यात फटाक्यामुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाण्यात फटाक्यामुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील एका 6 वर्षीय चिमुकल्याचा सुतळी बॉम्बच्या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यश गवते असे मृत बालकाचे नाव असून तो घराबाहेर असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. 

या वेळी त्याच्याजवळ असलेल्या सुतळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. सुतळी बॉम्बच्या स्फोटात यश गंभीर जखमी झाला, त्याच्या तोंडाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती.

स्फोटानंतर जखमी यशला नातेवाईकांनी तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण दिवाळीतील याच फटाक्यामुळे यशचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यशच्या मृत्यूमुळे पिंपळगाव सराई गावात शोककळा पसरली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version