आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ६ जणांना अटक

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ६ जणांना अटक

शिवराज्याभिषेकदिनी सर्वत्र सोहळा साजरा करण्यात आला. तर, कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यामुळे, मंगळवारी (दि. ६ जून) दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.औरंगजेबाचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. त्यांनी बुधवारी (दि. ७ जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले आहेत. पोलिसांनी संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे.

अशातच गृहमंत्रालयाने कोल्हापुरात शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती केसरकर यांनी सांगितलं आहे. तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहेत. तर कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version