आज ५४२ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

आज ५४२ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारले. राज्य सरकारने काढलेला जीआरमधील तपशील कर्मचारी संघटनांनी अमान्य केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संपाच्य भूमिकेवर ठाम राहणार असल्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. आजही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी संपाचे हत्यार उपसले. याविरोधात एसटी महामंडळाने मोठी कारवाई सुरू केली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमीका घेण्यात आली. काल संपावर असलेल्या ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केले आहे. आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई सुरूच असून ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मात्र खाजगी वाहनांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version