SCचा विरोधकांना मोठा दणका; 50 टक्के VVPAT मशीन पडताळणीची याचिका फेटाळली

SCचा विरोधकांना मोठा दणका; 50 टक्के VVPAT मशीन पडताळणीची याचिका फेटाळली

50 टक्के व्हीव्हीपॅट मशीन्स तपासण्यासाठी विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून विरोधकांना मोठा दणका देण्यात आला आहे. 21 विरोधकांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात धाव घेतली होती. न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपिठाने ही याचिका फेटाळली असून यामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?

तीन अठवड्यांपूर्वी विरोधकांनी 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीन्स तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी दिली असून याचिका फेटाळली असल्याचे म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ही याचिका फेटाळली असून हेच प्रकरण किती वेळा ऐकायचं असे म्हणत हे प्रकरण लवकर निकाली काढले.

मात्र 50 टक्के व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनची तपासणी केली तर निकाल सहा दिवस उशीरा जाहीर होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनची तपासणी केली असती तर मतमोजणी प्रक्रिया आणखी पारदर्शक झाली असती, असे विरोधकांची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं आहे.

टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू हे फक्त सुनावणीसाठी दिल्लीला आले होते.

आम्हाला केवळ न्याय हवा असून मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक झाली असती असे चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version