जय महाराष्ट्र न्यूज, पुणतांबा
5 जूनला महाराष्ट्र बंद ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत, पुणतांब्यातील आठवडा बाजाराही बंद ठेवण्यात येणार आहे. तर, अजित नवले हे शेतकरी एक दिवसासाठी आत्मक्लेश करणार आहेत.
पुणतांब्यातही एक शेतकरी उपोषणाला बसणार आहेत. पुणतांब्यात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ठिकठिकाणचे शेतकरी सहभागी झाले होते.
पुणतांबा हे शेतकरी संपाचं केंद्रस्थान आहे. 1 जूनपासून शेतकरी संपाची हाक सर्वातआधी पुणतांबा गावातून देण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.