‘मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार’ – देवेंद्र फडणवीस

‘मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार’ – देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गरुवारी सकाळी जेजे परिसरातील हुसेनी इमारत पत्त्यांसारखी कोसळली. या दुर्घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या रहिवाशांचा खर्च राज्य सरकार करणार तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करणार असल्याचे

आश्वासन त्यांनी दिले.

 

दुर्घटनेचा सविस्तर अहवाल सादर करा तसंच चौकशी करुन दोषींवर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अतिरिक्त मुख्य

सचिवांनाही याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version