राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू होण्याची शक्यता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसीय आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. कामकाजासाठी पाच दिवसीय आठवडा करण्याच्या दिशेने सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

 

मुख्य सचिवांनी सामान्य प्रशासन विभागाला पाच दिवसीय आठवडा करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रस्ताव त्यानंतर जुलै महिन्यात पार पडणाऱ्या मंत्रिमंडळ बैठरीत सादर करण्यात येणार आहे.

 

त्यामुळे हा प्रस्ताव पास झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक आठवड्यात केवळ पाच दिवस कार्यालयीन काम करावं लागणार आहे. यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताणही दूर होण्यास मदत होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version