गोरेगावमध्ये म्हाडा बांधणार 5 हजार घरे

गोरेगावमध्ये म्हाडा बांधणार 5 हजार घरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पहाडी गोरेगाव येथे म्हाडा 5 हजार घरे बांधणार आहे. 18 एकर परिसरात ही घरे बांधली जाणार आहेत.

हा प्रकल्प अ आणि ब अशा 2 भूखंडात विभागण्यात आला आहे. भूंखड अ वर  2950 घरे बांधणार आहे आणि भूखंड ब वर  2109 घरे बांधली जाणार आहेत.  हा प्रकल्प येत्या 3 वर्षात पुर्ण केला जाणार आहे. 

गेल्या 25 वर्षापासून म्हाडाची ही जमिन न्यायलयीन प्रक्रियेत अडकली होती. नंतर जमिनीबाबात म्हाडाच्या बाजूने निकाल लागला आणि जमिनीवर दावा ठोकणा-या व्यक्तीचा दावा फेटाळला गेलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version