जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एकिकडे कर्जमाफी आणि पीकाला हमीभाव मिळावा म्हणून शेतकऱ्याने ऐतिहासिक संप पुकारला आहे. तरी दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहेत.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अकोल्यामधील गणेश काळबंडे या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेतला. अल्पभूधारक असलेल्या काळबंडेंसमोर पावसाळ्यात पेरणी करण्याकरता बी-बियाण्यांची तजवीज करण्याचं आव्हान होतं.
त्यातच डोक्यावरील वाढत्या कर्जाच्या बोज्याने गणेश काळबंडे हवालदिल झाले होते. त्यामुळेच नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या काळबंडेंनी अखेर आयुष्य संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू झाल्यानंतर गेल्या 48 तासांत तब्बल तीन शेतकऱ्यांनी आपला इहलोकीचा प्रवास संपवल्याने खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.