Marathwada Farmers News : कर्ज, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक चणचण…शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली; हताश होऊन उचलले टोकाचे पाऊल, शेतकरी मृत्यू प्रमाणात वाढ

Marathwada Farmers News : कर्ज, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक चणचण…शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली; हताश होऊन उचलले टोकाचे पाऊल, शेतकरी मृत्यू प्रमाणात वाढ

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरला आहे. कर्जबाजारीपणा, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक विवंचना यामुळे अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 465 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर केली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक कुटुंबे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या 465 प्रकरणांपैकी केवळ 295 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून, आतापर्यंत फक्त 108 कुटुंबांनाच मदत मिळाली आहे. तर 222 प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू आहे. जिल्हानिहाय पाहता छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहता सर्वाधिक 109 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. 

हेही वाचा : Moshi Building Collapse : मोशी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात यश; 12 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकून, बचावकार्य सुरू

जिल्हानिहाय आकडेवारी –

छत्रपती संभाजीनगर 109
बीड 95
धाराशिव 65 
नांदेड 61
जालना 40
हिंगोली 35
परभणी 34
लातूरमध्ये 26

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version