मुंबई विद्यापीठातील 4 कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई विद्यापीठातील 4 कर्मचाऱ्यांना अटक

बनावट गुणपत्रिका बनवून विदयार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 

सुयश हळदणकर या इंजीनिअरिंगच्या मुलाने बनवून घेतलेल्या बनावट मार्कशीटमुळे हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे.

रत्नागिरीतील फिनोलेक्स कॉलेजनं तक्रारीवरुन केलेल्या कारवाईचे धागेदोरे थेट मुंबई विद्यापीठापर्यंत गेले आहेत.

कारण या  टोळीमध्ये मुंबई विद्यापीठाचे 4 कर्मचारी असल्याचे समोर आले आहे, आणि त्यांना अटकही झाली आहे, याप्रकरणी एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील क्लार्क गणेश मुणगेकर, शिपाई प्रवीण वारीक, आणि महेश बागवे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्यामुळे या प्रकरणात एकूण 6 जणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती पाहता बनावट प्रमाणपत्र देण्याचं हे रॅकेट आणखी मोठं असण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version