दापोली-पुणे शिवशाही बसला अपघात, 31 प्रवासी जखमी

दापोली-पुणे शिवशाही बसला अपघात, 31 प्रवासी जखमी

जय महाराष्ट्र वेब न्यूज, रायगड

राज्य परिवहन मंडळाच्या दापोली-पुणे शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

या अपघातात 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दापोलीवरुन पुण्याच्या दिशेने ही बस जात असताना शनिवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाता बस पलटल्याने 31 प्रवासी जखमी झाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version