पॅन कार्ड आणि ‘आधार’ क्रमांक यांना एकमेकांशी संलग्न करण्याची मुदत शुक्रवारी संपत आहे. दोन्ही क्रमांक एकमेकांना जोडण्याची सुविधा प्राप्तिकर विभागाने आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली आहे. ही प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण न केल्यास पॅन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आयकर विभागानं पॅन- आधार संलग्न करण्याची ३० जून २०२३ ही अंतिम मुदत दिली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं ३० जूनच्या अंतिम मुदतीपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर त्यांचा पॅन निष्क्रिय होईल. म्हणजेच त्यांना अनेक सरकारी आणि निमसरकारी कामांसाठी महत्त्वाचं कागदपत्र म्हणून पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे, त्या ठिकाणी कामासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परंतु आयकर विभागानं यातून काही श्रेणींना सूट दिली आहे. त्यांच्यासाठी पॅन- आधार संलग्न करण्याची अंतिम मुदत ही ३० जून नसेल.
आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९एए नुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला १ जुलै २०१७ रोजी पॅन जारी करण्यात आले आहे आणि जो आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहे, त्यांनी ३० जूनच्या अंतिम मुदतीच्या आत आपला आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे.
जर तुम्ही या मुदतीपर्यंत पॅन लिंक केलं नाही तर पॅन निष्क्रिय होईल. यापूर्वी अनेकदा याला मुदतवाढ देण्यात आली होती. जर यावेळीही मुदतवाढ देण्यात आली तर पॅन- आधार संलग्न करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळू शकतो.
लिंक न केल्यास काय होणार?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.