…अन् ‘त्या’ तिघींनी सुधारगृहातून पळ काढला

…अन् ‘त्या’ तिघींनी सुधारगृहातून पळ काढला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पालघरमध्ये महिला सुधारगृहातून 3 तरुणींनी पलायन केल्याची घटना घडली आहे. या तिघींमध्ये 1 अल्पवयीन तर, 2 महिलांचा समावेश आहे. पालघरच्या लालांडे फुलांचा येथे हा महिला सुधारगृह आहे. या तरुणी वेश्या व्यवसायात अडकल्या होत्या. त्यातून त्यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते.

 

गुरुवारी सायंकाळपासून या मुली सुधारगृहात दिसत नाही. हे लक्षात येताच सुधारगृहाच्या अधिक्षकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. आणि याबाबत मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version