पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा जीव गेला.<br/>
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात डोंबिवलीचे 3 पर्यटक, अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे. संजय लेले हे आपल्या कुटुंबसोबत डोंबिवलीतील श्री विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तवाला होते. पनवेलमधील दिलीप देसलेंचा देखील हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एकूण 27 जणांचा मृत्यू झाला असून, 5 पर्यटक जखमी झाले आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच, महाराष्ट्र सरकारने तत्परतेने मदत जाहीर केली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरातील हे मृत जण होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या परिस्थितीवर लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांना योग्य दिशा दिली आहे. 

पंतप्रधान मोदींनी सौदी दौरा अर्धवट सोडून देशात घेतली परतफेर, पहलगाम हल्ल्याची केली पाहणी

आतापर्यंत हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना आवश्यक उपचार दिले जात आहेत. घटनास्थळी जिल्हा प्रशासनाने मदत कार्य हाती घेतले असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, त्यांना प्रत्येक प्रकाराची मदत मिळेल.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version