3 दिवसांत 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

3 दिवसांत 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सलग 3 दिवसांत 8 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सोलापूर, सातारा, बुलडाणा, बारामती, अकोला, भंडारा, नाशकात प्रत्येकी एका शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं.

 

आज 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सोलापूरच्या करमाळ्यात धनाजी जाधव आणि बीडमध्ये भगवान पवळ यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. तर साताऱ्यात सुभाष शिंगाडे आणि बुलडाण्यात प्रदीप गुंजळ आणि तर बारामतीत हनुमंत शिंदेंनी विष पिऊन आयुष्य संपवलं.

 

तसंच बुधवारी अकोल्यात गणेश काळबांडे आणि मंगळवारी भंडाऱ्यात ईश्वर मदनकर यांनी गळफास घेतला. मंगळवारीच नाशिकमध्ये नवनाथ भालेरावनं विष पिऊन आयुष्याचा शेवट केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version