2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच

2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच

जय महाराष्ट्र न्यूज , मुंबई

 

इंटेक्स कंपनीने स्मार्टफोन युजर्ससाठी एक खुशखबर आणली आहे. सध्या 4G फोनचे वेध लागले आहे.

 

 पण जास्त किमतीचा 4G फोन सगळ्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. म्हणूनच इंटेक्स कंपनीने पहिल्यांदाच

4G फोन फक्त 6,499 या किमतीत लॉंच केला आहे.

 

3.5 इंच HD डिस्प्लेसह 2GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज असलेला इंटेक्स एक्वा लायन्स-3 आता भारतीय बाजारपेठेत लॉंच करण्यात आला आहे.

तसेच एक्वा लायन्स-3 हा 4G फोन वाई-फाई, ब्लूटूथ आणि OTG ला सपोर्ट करणारा असून लायन्स-3 हा इतर 4G फोनला टक्कर देणारा आहे.

असा इंटेक्स कंपनीने दावा केला आहे.

 

इंटेक्स  एक्वा लायन्स-3 चे फिचर्स :

 

– 8मेगापिक्सल फ्रंट आणि 8मेगापिक्सल बॅक कॅमेरा

 – LED फ्लॅश

 – 4000mAh बॅटरी

 – 1.2 GHz क्वार्ड कोर प्रोसेसर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version