2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी आरोपी निर्दोष – सीबीआय कोर्टाचा निर्णय

2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी आरोपी निर्दोष – सीबीआय कोर्टाचा निर्णय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

2010 साली झालेल्या 2G घोटाळ्याबाबत सीबीआय कोर्टाने आज निर्णय दिलाय. 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष म्हणून सुटका करण्यात ली आहे. 2G मुळे देशाला 1 लाख 76 हजार कोटींचा नुकसान सोसावा लागला. या घोटाळ्यात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए.राजा आणि डीएमकेच्या माजी खासदार कनिमोझी यांना तुरुंगातही जावं लागलं. या दोघांसह अनेक कंपन्या आणि व्यावसायिकांवरही या घोटाळ्याप्रकरणी आरोप होते.

 

सीबीआय कोर्टाने ऑक्टोबर 2011 मध्ये आरोपींविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रं बनवणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, सरकारी पदाचा दुरुपयोग, गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार अशा कलमाअंतर्गत आरोप निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली सीबीआय कोर्टाने निर्णय देत सर्व आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version