वरातीच्या पंगतीत २७ जणांना विषबाधा

वरातीच्या पंगतीत २७ जणांना विषबाधा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्ण येथे एका विवाह सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी वराकडे झालेल्या वरात पंगतीत २७ जणांना अन्नातून विषबाधा झाली. यापैकी अनेकांना १७ मे रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे.

येलकी पूर्ण येथील दीपक पवार यांचा मुलगा राजकुमार याचा विवाह सोहळा १५ मे रोजी दर्यापूर येथे पार पडला. दुसऱ्या दिवशी वरात पंगत पार पडली. या कार्यक्रमांमध्ये पाहुणे मंडळी, गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. जेवणाचा आनंद घेतला. मात्र त्यानंतर रात्रीपासून लहान मुले मुली , महिला आणि पुरुषांना पोटदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाला. एकेक करीत २५ हून अधिक व्यक्तींना १७ मे च्या सकाळी अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काहींना परतवाडा येथील कुटिर रुग्णालयात पाठवण्यात आले. अनेकांना उपजिल्हा रुग्णालयातच उपचार देण्यात येत आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सध्या सांगण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version