पुण्यात एसटीचे २७ कोटींचे नुकसान

पुण्यात एसटीचे २७ कोटींचे नुकसान

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. ८ नोव्हेंबरपासून पुणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पुणे विभागात एसटीचे तब्बल २७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्याभरापासून पुण्यात एसटी कर्मचारी आंदोलनावर बसले आहेत. त्यामुळे पुण्यातील एसटीचे २७ कोटींचे नुकसान झाले आहे. एसटी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू झाले नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला. त्यामुळे आतापर्यंत पुणे विभागातील ९०० एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर काही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एसटीमधील वर्कशॉप, प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे तर एसटीचे चालक आणि वाहकांचा मात्र कामावर येण्यास अद्यपही नकार आहे.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र तरिही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेतले नाही तर कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version