युक्रेनमधील २५० भारतीय विद्यार्थी रोमानियात दाखल

युक्रेनमधील २५० भारतीय विद्यार्थी रोमानियात दाखल

रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा संघर्ष सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक, विद्यार्थ्यांमुळे चिंता वाढली आहे. मात्र, युक्रेनमधील भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना बसच्या सहाय्याने रोमानिया विमानतळावर नेण्यात आल्याची माहिती अमरावतीमधील विद्यार्थ्याने दिली आहे.

युक्रेनमधील २५० भारतीय विद्यार्थी रोमानियात दाखल झाली असून या विद्यार्थ्यांना दिल्लीला आणण्यात येणार आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना रोमानियात सुरक्षितरित्या आणण्यात आले असून रोमानिया नागरिकांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या जेवणाची सुखरुप सोय केली आहे. तसेच आता लवकरच विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय दूतावासाने मदतकार्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version