… तर शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि जबरदस्त आंदोलन छेडेल; उद्धव ठाकरेंचा इशारा

… तर शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि जबरदस्त आंदोलन छेडेल; उद्धव ठाकरेंचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या एकजुटीनेच सरकारला झुकवले. या एकजुटीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

 

सरसकट कर्जमाफीला तत्त्वतः मंजुरी देऊन सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, पण या निर्णयाच्या अंमलबजावणीला वेळेची मर्यादा हवी.

 

हा निर्णय तत्काळ कृतीत उतरवा, सरसकट कर्जमाफी ताबडतोब द्या, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. असे झाले नाही तर शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि

जबरदस्त आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version