म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बसले उपोषणाला

म्हणून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बसले उपोषणाला

वृत्तसंस्था, मंदसौर

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दशहरा मैदानात एक दिवसाच्या उपोषणाला सुरुवात केली. मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर शिवराजसिंह चौहान सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला.

 

मंदसौर हा भाजपचा गड मानला जातो. या भागातील असंतोष कमी करण्यासाठी थोडक्यात डॅमेज कंट्रोलसाठी स्वत: मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत.

 

शिवराजसिंह यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत, सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचला, सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजना आणि सवलतींची माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version