म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री सुरु

म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

 

शेतकरी संपाच्या आजच्या पाचव्या दिवशीही आंदोलन तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. पुणतांबा येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री सुरु असल्याचं दिसुन आलं.

 

नाशिक मधून भाजीपाल्याची मोठी आवक झाल्यानं धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाला विक्री सुरळीत सुरू आहे. आजच्या महाराष्ट्र बंदला भाजप वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिलाय. शिवसेनेच्यावतीनं आज धुळे बंदची हाक देण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version