बजेटमध्ये अरूण जेटली यांनी केली नवीन योजनांची घोषणा

बजेटमध्ये अरूण जेटली यांनी केली नवीन योजनांची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2018-19 च्या देशाच्या बजेटची घोषणा केली आहे. अरूण जेटली यांनी बजेटची घोषणा करत असताना मच्छिमार आणि शेतकऱ्यासांठीही महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. ग्रामीण क्षेत्रात विकास घडावा या उद्देशाने या योजना आखण्यात आल्या आहेत.

अरूण जेटलींनी या योजनांची घोषणा केली आहे :

मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड – शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंर्गत शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना सहजतेने कर्ज मिळण्यास मदत होईल.

आयुष्मान भारत योजना – देशातील 10 करोड कुटुंबांना 5 लाख रुपयांचा विमा मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना या योजनेअंर्गत इलाजाकरिता 5 लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत.

गोबर धन योजना – सरकारने ग्रामीण विकासासाठी या नवीन योजनेची घोषणा केली आहे.

उज्ज्वला योजना – मोदी सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मिळणारे मोफत एलीपीजी कनेक्शची संख्या 8 करोड पर्यंत गाठण्याचा टार्गेट ठेवला आहे.

सौभाग्य योजना – या योजनेअंर्गत ग्रामीण भागात इलेक्ट्रीक कनेक्शनची संख्या 4 करोड कुटुंबांपर्यंत पोहचवण्याचा टार्गेट ठेवला आहे. ही योजना सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना आहे.

उडान योजना – या योजनेअंर्गत विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढणार.

एकलव्य स्कुल –  या योजनेअंर्गत सरकार शैक्षणिक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी खर्च करणार  या योजनेअंर्गत  शैक्षणिक क्षेत्रासाठी 1 लाख कोटींचा निधी खर्च करणार    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version