जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सचिन तेंडुलकरच्या मुलीसोबत म्हणजेच सारा तेंडुलकरबरोबर फोनवरुन गैरवर्तन केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. देवकुमार मैती असं संशयित व्यक्तीचं नाव आहे.
देवकुमारने 2 तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरी फोन केला होता आणि साराला अपशब्द वापरले होते. याप्रकरणी आता देवकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
त्याने सारासोबत गैरवर्तन का केलं. याचा तपास पोलीस घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.