जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
मराठवाडा विद्यापीठावर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. मोठी ताकद लावूनही भाजपप्रणित पॅनेलला फक्त 7 जागा मिळाल्या.
अधिसभा आणि विद्या परिषद अशी एकूण 37 जागांसाठी निवडणूक झाली. 27 जागा जिंकत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलनं बाजी मारलीये.
तर, भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचला 7 जागांवर समाधान मानवं लागलंय. 3 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आलेत.
मराठावाडा विद्यापीठ निवडणुकीतल्या विजयी उमेदवार
विजयी उमेदवार ( अधिसभा शिक्षक)
१) डॉ. राजेश करपे (उत्कर्ष पॅनल)
२) डॉ. लक्ष्मीकांत शिंदे (उत्कर्ष पॅनल)
३) डॉ. मुंजा धोंडगे (उत्कर्ष पॅनल)
४) प्रा. विजया मुसांडे (उत्कर्ष पॅनल)
५) डॉ. बाबासाहेब कोकाटे (उत्कर्ष पॅनल)
६) डॉ. फिरोजखान पठाण (उत्कर्ष पॅनल)
७) डॉ. सदाशिव सरकटे (उत्कर्ष पॅनल)
८) डॉ. फुलचंद सलामपुरे (उत्कर्ष पॅनल)
९) डॉ. भगवानसिंह डोभाळ (विद्यापीठ विकास मंच)
१०) डॉ. गोविंद काळे (विद्यापीठ विकास मंच)
विद्या परिषद
१) डॉ. संजय कोरेकर (उत्कर्ष पॅनल)
२) डॉ. रमेश मंझा (उत्कर्ष पॅनल)
३) डॉ. मोहम्मद रज्जाउल्ला खान (उत्कर्ष पॅनल)
४) डॉ. विलास खंदारे (उत्कर्ष पॅनल)
५) डॉ. प्रतिभा अहिरे (उत्कर्ष पॅनल)
६) डॉ. अरुंधती पाटील (उत्कर्ष पॅनल)
७) डॉ. प्रभाकर कराड (उत्कर्ष पॅनल)
८) डॉ. जितेंद्र अहिरराव (विद्यापीठ विकास मंच)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.