मंत्र्यांचे लाल दिवे इतिहासजमा

मंत्र्यांचे लाल दिवे इतिहासजमा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवा आजपासून इतिहासजमा होणार आहेत.

 

केंद्र सरकरानं व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी गाडीवर लाल दिवा न लावण्याचा निर्णय घेतला, त्याची अमंलबजावणी आजपासून केली जाणार आहे.

 

मोदी सरकारानं हा निर्णय घेताच काही मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून ठेवला होता. पण, आता कोणत्याही मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला लाल दिवा नसणार नाही.

 

फक्त अत्यावश्यक सेवांकरीता निळा दिवा वापरला जाणार आहे. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त निळा दिवा वापरण्यात येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version