दहावी आणि बारावीचा निकाल कधी ?

दहावी आणि बारावीचा निकाल कधी ?

मुंबई, २ मे २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. निकाल लवकर जाहीर होणार असल्यामुळे अकरावी, पदविका अर्थात डिप्लोमा, आयटीआय आणि विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेला सुमारे चौदा लाख विद्यार्थी आणि दहावीच्या परीक्षेला सुमारे सोळा लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेला बसलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नातलग यांचे लक्ष निकालाकडे आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version