‘या’ जागांवर उमेदवार ठरेना !

‘या’ जागांवर उमेदवार ठरेना !

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भारताच्या अठराव्या लोकसभेसाठी दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुसंख्य जागांसाठी सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. पण चार मतदारसंघ असे आहेत ज्यांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत.

ठाणे लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिउबाठाचा (राजन विचारे) – शिवसेनेचा उमेदवार ठरेना (संभाव्य – प्रताप सरनाईक)
कल्याण लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिवसेनेचा (डॉ. श्रीकांत शिंदे) – शिवसेनेचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर होईना (संभाव्य – डॉ. श्रीकांत शिंदे)
पालघर लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिवसेनेचा (राजेंद्र गावित) – महायुतीचा उमेदवार ठरेना (संभाव्य – राजेंद्र गावित)
नाशिक लोकसभा मतदारसंघ – विद्यमान खासदार शिवसेनेचा (हेमंत गोडसे) – महायुतीचा उमेदवार ठरेना (संभाव्य – हेमंत गोडसे, छगन भुजबळ)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version