उज्ज्वल निकम भाजपात

उज्ज्वल निकम भाजपात

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे पक्षात स्वागत केले. उज्ज्वल निकम यांनी पक्ष प्रवेशानंतर लोकसभा निवडणुकीत विजय भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत ?

उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version