सलमानच्या घराबाहेर गोळीबार, ६ जणांवर मोक्का लावणार

सलमानच्या घराबाहेर गोळीबार, ६ जणांवर मोक्का लावणार

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी सहा आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. बिश्नोई टोळीचा सध्या तुरुंगात असलेला प्रमुख लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा परदेशात असलेला भाऊ अनमोल बिश्नोई या दोघांवर मोक्का लावला जाणार आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांवर मोक्का लावला जाणार आहे. तसेच दोन पिस्तुलं आणि ३८ काडतुसांचा पुरवठा केल्याप्रकरणी सोनू बिश्नोई आणि अनुज थापन या दोघांवर मोक्का लावला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version