‘मुंबईचे योद्धे’ संसदेत जाणार !

‘मुंबईचे योद्धे’ संसदेत जाणार !

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेले विधीज्ञ उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे. भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले आहे. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपाने विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच, ‘मुंबईचे योद्धे’ संसदेत जाणार; असा विश्वास मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ट्वीट करून आशिष शेलार यांनी हा विश्वास व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version