पुण्यातील बिबेवाडी परिसरात कोयत्याची दहशत.

पुण्यातील बिबेवाडी परिसरात कोयत्याची दहशत.

पुणे, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील बिबेवाडी सुपर परिसरात गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास १० ते १५ गुंडानी ५ रिक्षा, १५ ते २० दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे नुकसान करून  दहशत माजवण्याचा  प्रयत्न केला आहे. या भागातील महिला, लहान- लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. वारंवार असे प्रकार घडत असून पोलीस या गुंड्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोयत्याची दहशत वाढत आहे. परंतु पुणे पोलिसांना कोयत्याची दहशत मोडीत काढण्यास अपयश येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version