गडकरींना आली भोवळ

गडकरींना आली भोवळ

पुसद, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांना प्रचारसभेत भोवळ आली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे प्रचारसभेत घडली. भोवळ येताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी गडकरींना उचलून मागे नेले. पाणी पाजले. यानंतर गडकरींनी थोडा वेळ विश्रांती घेतली. बरे वाटल्यानंतर गडकरींनी पुन्हा भाषण सुरू केले.

गडकरींना पाचव्यांदा आली भोवळ

नितीन गडकरी यांना सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ येण्याची घटना पाचव्यांदा घडली आहे. यावेळी ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे प्रचारसभेत घडली. यामुळे गडकरींच्या तब्येतीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

गडकरींना किती वेळा आली भोवळ ?

१ यवतमाळमधील पुसद – २४ एप्रिल २०२४
२ पश्चिम बंगालमधील सिलिगुडीतील दागापूर – नोव्हेंबर २०२२
३ सोलापूर विद्यापीठ – ऑगस्ट २०१९
४ शिर्डी – एप्रिल २०१९
५ राहुरी कृषी विद्यापीठ – डिसेंबर २०१८

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात अशी होणार लढत ?

राजश्री पाटील, शिवसेना विरुद्ध संजय देशमुख, शिउबाठा विरुद्ध खेमसिंग पवार, वंचित विरुद्ध प्रशांत बोडखे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version