अकोला , २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी :अकोल्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मुंडगाव शेतशिवरात देखील आंबा पिकांना गारपिटमूळे प्रचंड नुकसानं झाले. तर काही भागात आंब्याचे झाड़ कोसळले आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने तातडीने संबंधित विभागांना पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.