संभाजीनगर , २२ अपील २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर जात प्रमाणपत्रांच्या वितरणाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात १ नोव्हेंबर २०२३ पासून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ५ हजार ५३० जात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६८ हजार २३५ प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी दिली.
कोणत्या जिल्ह्यात किती जात प्रमाणपत्र?
छत्रपती संभाजीनगर : ६७७६
जालना :८४१३
बीड: ६८२३५
परभणी : ७८३३
नांदेड: २१२९
धाराशिव: ७७२३
लातूर: १६२०
हिंगोली : २७९९
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.